विनामूल्य प्रशिक्षण घेऊन मिंटप्रो सह विमा एजंट प्रमाणपत्र मिळवा


Sign Up
/ विनामूल्य प्रशिक्षण घेऊन मिंटप्रो सह विमा एजंट प्रमाणपत्र मिळवा

विमा एजंट होण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम

जर आपण विमा एजंट होण्यास इच्छुक असाल, तर आपणास आय.आर.डी.ए.आय (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया) प्रस्तुत अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. अभ्यासक्रमामध्ये विमाच्या संकल्पना वर्णन केलेल्या असून एजंटना विमाच्या कार्याबद्दल ज्ञान मिळविता येते. त्या अभ्यासक्रमावर आधारित एक परीक्षा असते ज्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच विमा योजना सादर करण्यास परवाना मिळवून विमा एजंट होता येते. त्यामुळेच एजंटना तो अभ्यासक्रम समजून घेऊन अभ्यासणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यास आवश्यक असणारे पुस्तक

आय.सी. ३८ नावाच्या पुस्तकामध्ये विमा एजंट प्रमाणन मिळविण्याचा अभ्यासक्रम दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवन अथवा सामान्य विमा एजंट होण्यासाठी त्या पुस्तकाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमातील महत्वाचे विषय खालीलप्रमाणे आहेत.


 • द कन्सेप्ट अँड वर्किंग ऑफ इन्शुरन्स- यामध्ये विमा म्हणजे काय, ते कशाप्रकारे कार्यरत असते, विमाची गरज का आहे, इत्यादि मुद्दे वर्णन केलेले आहेत.
 • द प्रिंसिपल्स ऑफ इन्शुरन्स- यामध्ये ज्या सिद्धांतावर आधारित विमा योजना सादर केल्या जातात, त्या सिद्धांताबद्दल वर्णन केलेले आहे.
 • द टाईप्स ऑफ इन्शुरन्स प्लॅन्स- यामध्ये बाजारात असणाऱ्या जीवन विमाच्या प्रकारांबद्दल वर्णन केलेले आहे
 • क्लेम्स- जीवन विमा पॉलिसीमध्ये आढळणारे दावे कशाप्रकारे सोडवायला हवे याचे वर्णन केलेले आहे.
 • अंडररायटिंग- यामध्ये विमा संदर्भात असणाऱ्या धोक्यांबद्दल पॉलिसी सादर करण्याआधी विमा कंपनी त्याचे कशाप्रकारे मूल्यांकन करते त्याचे वर्णन केलेले आहे.
 • द प्रोफेशनल इन्शुरन्स मार्केट- यामध्ये विमा बाजाराचे स्वरूप, त्याची संरचना आणि एजंटने कशाप्रकारे व्यवसाय सांभाळायला हवे याचे वर्णन केलेले आहे.
 • वर्क एथिक्स- यामध्ये विमा एजंट व विमा कंपनीने अचूक आणि योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी मांडलेल्या कायद्यांबद्दल वर्णन केलेले आहे.
 • ग्रिवन्स रिड्रेसल- हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. यामध्ये विमा संदर्भात पॉलिसी धारकांना होणाऱ्या नुकसानाचे निवारण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे वर्णन केलेले आहे.

नमुना प्रश्नांचा संच

सामान्य विमा परीक्षा-


खालीलपैकी कोणती पद्धत रिस्क ट्रान्सफर आहे?


 • बँक एफ.डी
 • इन्शुरन्स
 • ईक्विटी शेअर्स
 • रियल इस्टेट

ग्राहकांच्या संबंधांमध्ये आपली पहिली छाप कशामुळे पडते?


 • आत्मविश्वासाने सामोरे जाणे
 • वेळेवर सेवेस हजर राहून
 • आपल्या कामात इच्छा व्यक्त करून
 • वरीलपैकी तीनही गोष्टीने

खालीलपैकी कोणत्या घटकाचा एका व्यक्तीच्या विकृतीवर परिणाम होत नाही?


 • लिंग
 • पती/पत्नी सोबत जॉब असणे
 • सवयी
 • राहण्याचे ठिकाण

नुकसान भरपाई करण्याच्या सिद्धांतानुसार, विमा पॉलिसी धारकास खलीलपैकी किती रक्कम दिली जाते?


 • प्रत्यक्षात झालेल्या नुकसानाच्या भरपाईच्या रकमेपासून विमा घेतलेल्या रकमेपर्यंत
 • विमा घेतलेल्या रकमे इतकेच
 • दोन पार्टी मधील निश्चित करून एक ठरवलेली रक्कम
 • प्रत्यक्षात झालेल्या नुकसानाच्या भरपाईची रक्कम

खालीलपैकी रुग्णाच्या कोणत्या अवस्थेत आरोग्य विमा पॉलिसीमध्ये डॉमिसिलियरी हॉस्पिटलायजेशन समाविष्ट आहे?


 • रुग्णाची अवस्था अशी आहे की रुग्णास हॉस्पिटल अथवा नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात येऊ शकते
 • रुग्णालयात रिक्त जागेच्या कमतरतेमुळे रुग्णास हॉस्पिटल अथवा नर्सिंग होम मध्ये दाखल करता न येणे
 • रुगणाची चिकित्सा केवळ हॉस्पिटल अथवा नर्सिंग होम मध्येच करावी लागणे
 • हॉस्पिटलायजेशनचा काळ २४ तास ओलांडून जाणे

जीवन विमा परीक्षा –


खालीलपैकी कोण बहुधा व्हेरिएबल लाईफ इन्शुरन्स विकत घेतात?


 • फिक्स्ड रिटर्नची अपेक्षा ठेवणारे लोक
 • धोक्याच्या विरोधी असणारे व इक्विटी मध्ये इच्छा न दर्शविणारे लोक
 • इक्विटीशी संमत असणारे सुशिक्षित लोक
 • सामान्य तरुण पिढीचे लोक

खालीलपैकी कोणत्या नुकसानाची की मॅन इन्शुरन्स नुसार भरपाई केली जाते?


 • प्रॉपर्टी थेफ्ट
 • की पर्सन कामास उपलब्ध नसल्याने वाढलेल्या मुदतीमुळे झालेले नुकसान
 • जनरल लायबिलिटी
 • चूकांमुळे झालेले नुकसान

खालीलपैकी कोणता घटक जीवन विमा प्रीमियम ठरविण्यात समाविष्ट नाही?


 • मोरट्यालिटी
 • रिबेट
 • रिसर्व
 • मॅनेजमेंट एक्सपेन्सीस

जर पॉलिसी धारकाने पॉलिसी विकत घेतली परंतु त्याला ती मान्य नसल्यास ____ काळामध्ये तो पॉलिसी परत देऊन रिफंड मिळवू शकतो?


 • फ्री इवह्याल्युएशन
 • फ्री लुक
 • कॅन्सलेशन
 • फ्री ट्रायल

एखादी पॉलिसी मिळविण्यात केव्हा विलंब होऊ शकतो?


 • ड्यू डेट दिवशी प्रीमियम भरले गेले नाही तर
 • ड्यू डेटच्या आधी प्रीमियम भरले गेले नाही तर
 • मर्यादित वेळेमध्ये देखील प्रीमियम भरले गेले नाही तर
 • पॉलिसी सरेंडर झाल्यास

आय.आर.डी.आय.ए परीक्षा बाबत माहिती

प्रमाणन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, आय.आर.डी.ए.आय (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया) प्रस्तुत एक परीक्षा घेतली जाते. जर आपण त्या परीक्षेमध्ये किमान ४०% गुणांनी उत्तीर्ण झालात तर आपणास विमा एजंटचा परवाना मिळून आपण विमा योजना सादर करू शकता.

मिंटप्रोचा पर्याय

मिंटप्रो एक ऑनलाईन मंच असून ते आपणास त्याच्यासह नोंदणी करून पी.ओ.एस.पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) होण्याची संधी देते. पी.ओ.एस.पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) एक असा एजंट असतो जो विविध विमा कंपनीचे जीवन विमा व सामान्य विमाची विक्री करु शकतो.

पी.ओ.एस.पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) होण्यासाठीचा प्रमाणन अभ्यासक्रम अगदी सोपा आहे. कोणतीही व्यक्ती वर्ग १०वी उत्तीर्ण असल्यास व वय किमान १८ वर्ष असल्यास प्रमाणन अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवू शकते.

अभ्यासक्रम हा ऑनलाईन व्हिडिओ व ट्यूटोरिअलच्या मार्फत शिकवला जातो. तो अभ्यासक्रम त्या व्हिडिओच्या साहाय्याने आपण आपल्या संगणकाद्वारे अथवा स्मार्टफोनद्वारे आपल्या सोयीनुसार केव्हाही पाहून शिकून घेऊ शकता. त्या अभ्यासक्रमातून आपणास खलील गोष्टींचे ज्ञान मिळते-

 • विमाच्या संकल्पना व त्याचे कार्य
 • भारतातील विमा बाजाराविषयी माहिती
 • विमाचे वर्गीकरण
 • हेल्थ आणि पर्सनल ऍक्सिडेंट विमा बाबत माहिती
 • विमा संदर्भात आवश्यक असणारे कागदपत्रे
 • प्रीमियम
 • क्लेम्स
 • पॉलिसी धारकांची इच्छा व उत्साह टिकवून कसे ठेवावे
 • नुकसान भरपाईच्या प्रक्रिया बद्दल माहिती
 • ए.एम.एल आणि के.वाय.सी बद्दल मार्गदर्शन
 • पी.ओ.एस.पी ने काय करावे व काय करू नये त्याची माहिती

आपण एक नमुना व्हिडिओ येथे पाहू शकता

प्रमाणन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक परीक्षा आयोजित केली जाते. त्या परीक्षेत आपण किमान ४०% गुणांनी उत्तीर्ण झाल्यास, आपण मिंटप्रो सह पी.ओ.एस.पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) होऊ शकता.

जर आपणास एजंटसाठी असणाऱ्या त्रासदायक प्रमाणन अभ्यासक्रम नको असेल, तर आपण मिंटप्रो सह नोंदणी करून, ऑनलाईन प्रमाणन अभ्यासक्रमाचा अभ्यास करून पी.ओ.एस.पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) होऊ शकता.

विमा एजंट परीक्षा संदर्भात अधिक माहिती साठी येथे क्लिक करा