विमा एजंट बद्दल माहिती
‘विमा एजंट’ ग्राहक व विमा कंपनी मधील एक दुवा असतो. योग्य विमा योजना निवडण्या बाबत व तसेच फॉर्म भरण्यापासून दावा करण्यापर्यंत, इत्यादि कामामध्ये एजंट आपल्या सेवेस तत्पर असतो.
विमामध्ये करिअर का निवडावे?
विमामध्ये करिअर निवडण्याचे विविध फायदे आहेत. एक एजंट म्हणून आपण पुढील कार्य करू शकतो
- स्वइच्छेने काम करून स्वतः बॉस होणे
- जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याची संधी असणे.
- धोरणांमध्ये कमवलेल्या आकर्षक कमिशन व्यतिरिक्त स्वतःची वेगळी ओळख देखील कमवता येणे
अशाप्रकारे, ह्या सर्व फायद्यांमुळे, लोकांना विमा एजंट बनायचे असते.
विमा एजंट कोण होऊ शकतो?
एजंट होण्यासाठी दोन पात्रतेच्या अटी असतात. त्या अटी पूर्ण केल्यास आपण विमा एजंट होऊ शकता. त्या अटी खालीलप्रमाणे
- आपले वय किमान १८ वर्ष असावे.
- शैक्षणिक पात्रतेसाठी आपण जर ग्रामीण भागातील असाल तर किमान वर्ग १०वी उत्तीर्ण आणि शहरी भागातील असाल तर वर्ग १२वी उत्तीर्ण असायला हवे
वरील अटीस पात्र असल्यास कोणीही विमा एजंट होऊ शकतो . अशाप्रकारे, विमा एजन्सी तरुणांसाठी नोकरी, नव्या पदवी धारकांसाठी नोकरी, पदवीधारकांसाठी अर्ध वेळ नोकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नोकरी याचे वचन देते. गृहिणी व निवृत्त व्यक्ती देखील विमा एजन्सीसाठी प्रयत्न करू शकतात.
विमा एजंट होण्यासाठीचे टप्पे
आय.आर.डी.ए (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी) नुसार प्रमाणित एजंट होण्यासाठी एक प्रक्रिया असते. एजंट होण्यासाठी आपणास एका विशिष्ट विमा कंपनी सोबत नोंदणी करावी लागते, व त्यासाठी एक विशिष्ट प्रशिक्षण घ्यावे लागते, नमूद केलेल्या संकेतस्थळावर जाऊन परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावे लागते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपण विमा एजंट होऊ शकता. संपूर्ण प्रक्रिया विस्ताराने पाहूया.
- वरील अटीस पात्र असल्यास आपणास एजन्सीसाठी नोंदणी करावी लागेल.
- आपणास के.वाय.सी ची माहिती व कागदपत्रे जमा करून, ज्या कंपनीचा एजंट होण्यास इच्छुक असाल त्या कंपनीसह नोंदणी करावी लागते.
- यशस्वीपणे नोंदणी केल्यानंतर, नमूद केलेल्या काळासाठी आपणास प्रशिक्षण घ्यावे लागते. तो काळ आपणास कोणत्या प्रकारची एजन्सी इच्छुक आहे त्यावर निर्भर असतो. ते प्रशिक्षण वर्ग प्रशिक्षण स्वरूपाचे असते.
- प्रशिक्षणानंतर एक परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा आय.आर.डी.ए.आय (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया) द्वारा आयोजित असते. ती परीक्षा आपण संगणकाद्वारे ऑनलाईन अथवा लेखी स्वरूपात ही देऊ शकता.
- त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास आपण एजंट होऊन त्याचा परवाना मिळवू शकता.
विमा एजंट काय कमवू शकतो?
एजंटने उत्पन्न केलेल्या प्रीमियमच्या रकमेचे कमिशन त्याला मिळते. विविध विमा योजनेनुसार कमिशन मिळते. विविध विमा पॉलिसीच्या प्रिमियमचे ५% ते ४०% पर्यंत आपणास कमिशन मिळू शकते. या व्यतिरिक्त, जे एजंट उत्तम कामगिरी दर्शवतात त्यांच्यासाठी पारितोषिक आणि कार्यक्रमातून त्यांचे नावलौकिक केले जाते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एजंटना अधिक कमिशन, भेटवस्तू, गिफ्ट वाऊचार, व परदेशी सहली याचा लाभ मिळू शकतो.
एजंटना मिळणाऱ्या कमिशनचे स्वरूप कळून घेण्यासाठी येथे क्लिक करा. (घरातून विमा विकून पैसे कसे मिळवता येतात त्याच्या माहिती सह)
मिंटप्रो कोणत्या ऑफर प्रदान करते?
मिंटप्रो आपणास पी ओ एस पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) होण्याची संधी देते. पी ओ एस पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) हा एक प्रकारचा एजंट असतो. एक पी ओ एस पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) होऊन, आपण नामांकित विमा कंपन्यांच्या विमा योजनांची विक्री करू शकता. आपण जीवन विमा आणि सामान्य विमा जसे आरोग्य विमा, कार विमा, दुचाकी विमा, इत्यादि विमा योजनांची विक्री करू शकता.
पी ओ एस पी विमा एजंट प्रमाणन पात्रता आणि प्रक्रिया
- एक एजंट होण्यासाठी दोन विशिष्ट पात्रतेच्या अटी असतात ज्या आय.आर.डी.ए.आय प्रस्तुत असतात. त्या अटीस पात्र असल्यास आपण विमा एजंट म्हणून आपले भविष्य घडवू शकता. त्या अटी खालीलप्रमाणे-
- आपले वय किमान १८ वर्ष असावे.
- शैक्षणिक पात्रतेसाठी आपण किमान वर्ग १०वी उत्तीर्ण असावे.
- ह्या मूळ अटीस पात्र असल्यास आपण एजंट होऊ शकता. अशाप्रकारे, विमा एजन्सी तरुणांसाठी नोकरी, नव्या पदवी धारकांसाठी नोकरी, पदवीधारकांसाठी अर्ध वेळ नोकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नोकरी याचे वचन देते. गृहिणी व निवृत्त व्यक्ती देखील विमा एजन्सीसाठी प्रयत्न करू शकतात. तर ती प्रक्रिया आपण टप्प्या टप्प्याने पाहूया. ती प्रक्रिया पूर्ण करून परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास आपण विमा वितरक होऊ शकता.
- नमूद केलेल्या अटीस पात्र असल्यास, आपण प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करू शकता
- आपल्या के.वाय.सी. ची माहिती व कागदपत्रे जमा करावे लागते.
- नमूद केलेल्या काळासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते.
- प्रशिक्षणानंतर असलेली परीक्षा देऊन त्यामध्ये आपण उत्तीर्ण व्हावे लागते.
- परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास आपणास परवाना मिळून आपण विमा एजंट होऊ शकता.
एजंट होण्यासाठी पी ओ एस पी प्रमाणपत्र मिळविणे हा सर्वोत्कृष्ट मार्ग कसा?
एक विमा एजंट, विमा कंपनी व ग्राहक यांच्यामधील दुवा होऊन विमा पॉलिसीच्या विक्री मध्ये सहाय्यभूत ठरतो. योग्य विमा योजना निवडण्या बाबत व तसेच फॉर्म भरण्यापासून दावा करण्यापर्यंत, इत्यादि कामामध्ये एजंट आपल्या सेवेस तत्पर असतो.
आय.आर.डी.ए.आय (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया) प्रस्तुत पी ओ एस पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) हा विमा एजंट साठी २०१५ मध्ये नव्याने मांडलेला परवाना आहे. ह्या माध्यमातून विमा एजंट होण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. तो कसा? विमा एजंट एकाच कंपनीशी निगडित असून त्यांच्याच उत्पादनांची विक्री करू शकतो. परंतु आज ग्राहकांच्या मागण्या वाढल्या आहेत. त्यांना इतर सर्व पर्याय जाणून घेऊन सर्वोत्तम उत्पादन मिळविण्याची इच्छा असते व त्यासाठी योग्य त्या सल्ल्याची मागणी करतात. व एक पी ओ एस पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) चा परवाना अथवा प्रमाणन मिळवून आपणास हेच सल्ला देण्याचे कार्य करायचे असते. एक पी ओ एस पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) होऊन आपण अनेक विमा कंपन्यांनच्या धोरणांची विक्री करू शकता. टर्म लाइफ, यु.एल.आय.पी. , एन्डउमेन्ट लाईफ, मोटर, हेल्थ, पर्सनल ऍक्सीडन्ट, होम, ट्रॅव्हल, इत्यादि विविध विमा योजनांची विक्री आपण करू शकता.सामान्य विमा एजंट पेक्षा पी ओ एस पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) होणे हा अधिक चांगला पर्याय आहे. त्यामुळेच, अनेक लोक विमा मध्ये भविष्य घडवण्यासाठी पी ओ एस पी (पॉईन्ट ऑफ सेल पर्सन) होण्याचा मार्ग निवडतात.
बद्दल जाणून घ्या विमा एजंट प्रमाणन अभ्यासक्रम आणि विमा एजंट परीक्षा.