लोकांमध्ये विमाच्या फायद्यांसंबंधी वाढत्या जागरूकतेमुळे विमा क्षेत्रात वर्षानुवर्ष वाढ होत चालली आहे. ऑनलाइन विमा पॉलिसी विकत घेणें आता सोपे आणि अधिक आरामशीर बनले आहे. म्हणून, जीवन विमा असो की सामान्य विमा असो ,आता लोक आपल्या गरजेप्रमाणे योग्य विमा पॉलिसी घेऊन जलद गतीने विमा उतरवत आहेत. विमाच्या वाढत्या व्यापकतेमुळे, विमा कंपन्या आपल्या प्रीमिअम जमा करून घेण्यात सकारात्मक वाढ नोंदवून घेण्यास समर्थ राहिल्या आहेत. जुलै २०१९ विमा क्षेत्रासाठी एक उत्तम महिना होता, कारण अनेक विमा कंपन्यांनी जीवन आणि सामान्य विमा दोन्ही विभागांत जुलै २०१८ च्या तुलनेत बेहत्तर प्रीमिअम जमा करून घेतलेले होते.अनेक विमा कंपन्यांनी मागील वर्षापेक्षा आपल्या प्रीमिअम जमा होण्यात वाढही अनुभवली आहे. चला पाहू हे आकडे काय दर्शवतात-
जीवन विमा
जुलै २०१९ फ्यूचर जेनरलीसाठी विशेष संस्मरणीय महिना होता, ज्यामध्ये जीवन विमा कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. फ्यूचर जेनरली ही ७५.२५%च्या वाढीसह अग्रेसर राहिली, तर टाटा एआइए जीवन विमा कंपनी लिमिटेड या शर्यतीत तिच्या अगदीच मागे होती. इतर प्रमुख विमा कंपन्यांनीही सकारात्मक वाढ नोंदवली. चला, जीवन विमा क्षेत्रातील शीर्ष पाच प्रतिस्पर्धकांवर दृष्टिक्षेप करू या-
सामान्य विमा
सामान्य विमा क्षेत्रातही आशेप्रमाणेंच नवीन विमा कंपन्यांच्या विकासदरामध्ये वाढ नोंदवली गेली. शीर्ष दोन विमा कंपन्यांनी तिहेरी अंकांत वाढ नोंदवली, म्हणजेच त्यांनी आपले प्रीमिअम जमा दुप्पटपेक्षाही पुढे नेले. इतर कंपन्यांनीही दुहेरी अंकांत वाढ नोंदवली.सामान्य विमा क्षेत्रात शीर्ष पाच प्रतिस्पर्धक याप्रमाणें –
आकडे विमा उद्योगाची वाढ दर्शवत आहेत, ज्याचे भवितव्य नक्कीच उजळ आहे. जसेजसे विमा उत्पाद ग्राहकांसाठी लाभप्रद बनत चालले आहेत आणि सामान्य माणसाला विमाच्या गरजा व फायद्यांची अधिक माहिती मिळत चालली आहे, हे क्षेत्र अजून पुढे जाण्यसाठी पूर्णपणें तयार होत चालले आहे. ही तुमच्यासाठी खूषखबर आहे, कारण विमा उद्योगाच्या वाढीचे थेट परिणाम तुमच्या विमा व्यवसायावर होईल. तुम्ही तुमची विक्री वाढवू आणि अधिक कमीशन कमवू शकाल, कारण तुम्हाला विमा खरेदी करण्यासाठी नवीन अभिलाषी ग्राहक मिळत राहतील.