मिंटप्रप्रोसह आय.सी.आय.सी.आय विमा एजंट होण्यासाठीसंपूर्ण मार्गदर्शन


Sign Up
/ मिंटप्रप्रोसह आय.सी.आय.सी.आय विमा एजंट होण्यासाठीसंपूर्ण मार्गदर्शन

आय.सी.आय.सी.आय बद्दलमाहिती

आय.सी.आय.सी.आय हे जीवन आणि सामान्य विमा उद्योगात एक अग्रगण्य नाव आहे. आय.सी.आय.सी.आय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी २००१मध्ये जीवन विमा पॉलिसीच्या विक्रीसाठी निर्माण करण्यात आली होती.ही कंपनी आय.सी.आय.सी.आय बँक लिमिटेड आणि प्रुडेंशिअल कॉर्पोरेशन होल्डिंग्ज लिमिटेड यांच्या मधील एक उपक्रम आहे. दुसरीकडे, आय.सी.आय.सी.आय लोम्बार्ड, सामान्य विमा व्यवसायात आहे. आय.सी.आय.सी.आय लोम्बार्डला भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित आय.सी.आय.सी.आय बँकेद्वारे प्रोत्साहन दिले जाते.

जर आपण विमा एजंट म्हणून भविष्य घडविण्यास इच्छुक असाल तर आपल्याला काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. मूलभूत पात्रता निकष सोपी आहे व ती खालील प्रमाणे-


  • आपले वय 18 वर्षकिंवा त्यापेक्षा जास्त असायला हवे.
  • आपण ग्रामीण भागातील असल्यास आपण वर्ग १० वी उत्तीर्ण असायला हवे.आपण शहरी किंवा अर्ध-शहरी भागातील असाल तर वर्ग १२ वी उत्तीर्ण असायला हवे.

या दोन निकषांची पूर्तता झाल्यास, आपण कोणत्याही विमा कंपनीसह विमा एजन्सीसाठी अर्ज करू शकता. आय.सी.आय.सी.आय विमा एजंट होण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी करणे आवश्यक आहे-


  • नोंदणी फॉर्म भरून आणि आवश्यक फी भरून आय.सी.आय.सी.आय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सह नोंदणी करावी लागेल. आपण सामान्य विमा एजंट बनू इच्छित असल्यास, आय.सी.आय.सी.आय लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड सह नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी केल्यानंतर आपणास विमा एजंटच्या परीक्षेत पात्र होण्यासाठी २५ तासांचे वर्ग प्रशिक्षण घ्यावेलागेल. हेप्रशिक्षण इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आय.आर.डी.ए.आय) द्वारा आयोजित असून, ते प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. (IRDAI).
  • आपण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, आपल्याला ऑनलाइन विमा एजन्सी परीक्षेसाठी उपस्थित असणे आवश्यक असते जेदे खील आय.आर.डी.ए.आय ने ठरवले आहे.
  • आपण परीक्षा कमीत कमी ४०% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • आपण परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास आपल्याला विमा एजन्सीचा परवाना मिळून आपण आय.सी.आय.सी.आय एजंट होऊ शकाल.

जाणून घ्या विमा विक्री बद्दल सर्व काही.

मिंट प्रोचा पर्याय

आय.सी.आय.सी.आय विमा एजंट होण्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्याय आहे. मिन्ट प्रो तो पर्याय प्रदान करतो. आपण मिंटप्रोसह नोंदणी करुन पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) होऊ शकता.

पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) कोण असतो?

पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) एक प्रकारचा विमा एजंट आहे जो जीवन विमा आणि सामान्य विमा योजना दोन्ही विकू शकतो. पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) एकापेक्षा जास्त विमा कंपन्या देखील दर्शवू शकतो.

पॉईंटऑफसेलपर्सन (पी.ओ.एस.पी) कसे बनावे?

मिंट प्रो सह पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी) होण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी करणे आवश्यक आहे –


  • आपले वय किमान १८ वर्ष असल्यास वर्ग १० वी उत्तीर्ण असाल तर मिंटप्रोच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करावी.
  • व्हिडीओ आणि ट्युटोरियलद्वारे आयोजित ऑनलाइन प्रशिक्षण असतेजे आपण आपल्या मोबाइल किंवा संगणकामार्फत लाभघेऊ शकता.
  • प्रशिक्षण झाल्यानंतर एक ऑनलाईन परीक्षा असते जी आपण कोठूनही देऊ शकता.
  • एकदा आपण परीक्षेत उत्तीर्णझाल्यानंतर आपल्याला एक पॉईंट ऑफ सेल पर्सन (पीओएसपी)होण्याचा परवाना मिळेल.

मिंटप्रोचा पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी)होणेफायदेशीर कसे?

मिंटप्रोसह पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी)होण्याचे अनेक फायदे आहेत ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे-


  • आपल्याला विक्रीसाठी विविध कंपन्यांचे विविध प्रकारचे उत्पादने मिळतात ज्यामुळे आपली कमाई सुधारते.
  • पात्रते चे नियम सोपे आहेत.
  • प्रशिक्षण सोपे आणि सोयीस्कर आहे.
  • अभ्यासक्रम लहान आहे आणि परीक्षा उत्तीर्ण होणे देखील सोपे आहे.
  • पॉईन्ट ऑफ सेल पर्सन(पी.ओ.एस.पी) होण्यासाठी, विमा पॉलिसि विक्री करण्यासाठी आणि विक्री उत्तर सेवा आपल्या ग्राहकांना प्रदान करण्यासाठी मिंटप्रोकडून आपल्याला ऑनलाइन समर्थन मिळते.

म्हणून, आपण वर उल्लेख केलेल्या फायद्यांचा आनंद घेऊन आय.सी.आय.सी.आय विमा योजनांची एक पॉईंट ऑफ सेल पर्सन (पी.ओ.एस.पी)होऊन देखील विक्रीकरूशकता.

वाचा,विमा विक्रीतून आपण किती पैसे कमवू शकाल?